पंढरीला जाणाऱ्या वारकऱ्यांना विमा संरक्षण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आषाढी वारीमध्ये सहभागी झालेल्या लाखो वारकऱ्यांना विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू करण्याचा निर्णय आज राज्य शासनाने घेतला. त्याअंतर्गत वारीच्या 30 दिवसांसाठी प्रत्येक वारकऱ्याला विमा संरक्षण मिळणार आहे. याबाबतचा शासन आदेश आज जारी करण्यात आला.

पंढरीच्या वारीमध्ये लाखो आबालवृद्ध वारकरी सहभागी होतात. वारीमध्ये प्रचंड गर्दी असते. त्यामुळे अनेकदा अपघात व दुर्घटना घडतात. त्यात वारकऱ्यांना इजा पोहोचते. त्यामुळे ही योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेनुसार वारीमध्ये वारकऱ्याचा काही कारणास्तव दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांस 5 लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. दुर्घटनेत कायमचे अपंगत्व किंवा विकलांगता आल्यास 1 लाख रुपये आणि अंशतः अपंगत्व आल्यास 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत. वारीदरम्यान वारकरी आजारी पडल्यास औषधोपचारासाठी त्याला 35 हजार रुपयांपर्यंतचा खर्चही देण्याची तरतूद या योजनेमध्ये आहे.