मीरा जोशीचा ‘दिल मलंगी’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चित्रपट, मालिका, वेब सीरिज अशा तिन्ही माध्यमांत आपल्या दमदार अभिनयाची छाप उमटवणारी अभिनेत्री मीरा जोशी आता ‘दिल मलंगी’ या फॅण्टसी चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सद्गुरू एंटरटेनमेंट, दीपलक्ष्मी निर्मित या चित्रपटाचा मुहूर्त मढ येथील ‘शनाया’ या आलिशान ठिकाणी नुकताच करण्यात आला. या वेळी चित्रपटातील चिन्मय उदगीरकर, नक्षत्रा मेढेकर, मीरा जोशी, संजीव धुरी, नारायण जाधव, विनम्र भाबल या कलाकारांसह निर्माते रमाकांत भोसले, दीपा भोसले, प्रमोद मुरकुटे, दिग्दर्शक सुनील परब उपस्थित होते. चित्रपटाची कथा-पटकथा स्वप्नील गांगुर्डे यांची असून संवाद ‘हास्यजत्रा फेम’ अभिनेता प्रथमेश शिवलकर यांनी लिहिले आहेत. ‘चित्रपटाची हटके लव्हस्टोरी असून प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. या चित्रपटानिमित्ताने पहिल्यांदाच रोमान्स करताना दिसणार आहे. यामुळे माझी पडद्यावरची इमेज नक्कीच ब्रेक होईल’ असे मीरा जोशी म्हणाली.