एशिया कप स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरुवात, 2 सप्टेंबरला भिडणार हिंदुस्थान-पाकिस्तान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्रीलंका आणि पाकिस्तान येथे खेळवल्या जाणाऱ्या एशिया कप क्रिकेट स्पर्धेचं बिगुल वाजलं आहे. या स्पर्धेची सुरुवात 30 ऑगस्ट रोजी होणार आहे. तर या स्पर्धेचा अंतिम सामना 17 सप्टेंबर रोजी खेळवला जाईल. हिंदुस्थान आणि पाकिस्तान 2 सप्टेंबर रोजी आमनेसामने येणार आहेत.

या स्पर्धेची सुरुवात पाकिस्तान आणि नेपाळ सामन्यापासून होईल. हा सामना पाकिस्तान येथील मुलतान येथे 30 ऑगस्ट रोजी खेळवला जाणार आहे. तर 2 सप्टेंबरपासून हिंदुस्थानचे सामने सुरू होतील. पहिल्याच दिवशी हिंदुस्थानची गाठ आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी पडणार आहे. हा सामना श्रीलंकेच्या कँडी येथे खेळवला जाणार आहे.

स्पर्धेचं वेळापत्रक पुढील प्रमाणे –

30 ऑगस्ट – पाकिस्तान विरुद्ध नेपाळ – मुलतान
31 ऑगस्ट – बांग्लादेश विरुद्ध श्रीलंका – कँडी
2 सप्टेंबर – हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तान – कँडी
3 सप्टेंबर – बांग्लादेश विरुद्ध अफगाणिस्तान – लाहोर
4 सितम्बर – हिंदुस्थान विरुद्ध नेपाळ – कँडी
5 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान – लाहोर

सुपर-4 (सगळे संघ तीन सामने खेळणार)
6 सप्टेंबर – ए1 विरुद्ध बी2 – लाहोर
9 सप्टेंबर – बी1 विरुद्ध बी2 – कोलंबो
10 सप्टेंबर – ए1 विरुद्ध ए2 – कोलंबो
12 सप्टेंबर – ए2 विरुद्ध बी1 – कोलंबो
14 सप्टेंबर – ए1 विरुद्ध बी1 – कोलंबो
15 सप्टेंबर – ए2 विरुद्ध बी2 – कोलंबो

फायनल
17 सप्टेंबर – फायनल – कोलंबो

आशिया कपच्या यजमानपदावरून आधीच वाद झाले होते. यंदाच्या आशिया कपच्या यजमान पदाची धुरा पाकिस्तानवर होती. पण, हिंदुस्थानने सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानात जाण्यास नकार दिला होता. त्यानंतर ही स्पर्धा पार पडणार की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला होता. अर्थात आता यावर मार्ग काढण्यात आला आहे. आशिया कप आता हायब्रीड पद्धतीने खेळवला जाईल. आधी पाकिस्तानचा या पद्धतीला विरोध होता. पण, यजमानपद गमावल्याच्या धास्तीने या पद्धतीला पाकिस्तानने होकार दर्शवला. या पद्धतीनुसार आता चार सामन्यांचं आयोजन पाकिस्तानमध्ये होईल, तर उर्वरित सामन्यांचं आयोजन श्रीलंकेत होईल.