
कोथरूडमध्ये अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचा आणखी एक साथीदार मोहम्मद शहनवाज आलम याला राज्य दहशतवादविरोधी पथकाने रत्नागिरीतून अटक केली. त्याला 4 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे. दुचाकी चोरण्याच्या तयारीत असलेल्या इम्रान युनूस खान आणि युनूस याकूब साकी यांना गेल्या आठवडय़ात पोलिसांनी अटक केली. प्राथमिक तपासामध्ये हे दोघे फरारी दहशतवादी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आतापर्यंत त्यांच्या दोन साथीदारांना अटक करण्यात आली आहे.




























































