रशियाचे ‘लुना-25’ यान कोसळले; महत्त्वाकांक्षी मोहीम फसली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनियंत्रित कक्षेत भरकटल्यामुळे रशियाचे लुना-25 हे यान चंद्रावर कोसळल्यामुळे रशियाच्या चांद्रयान मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. लुना-25 चांद्रभूमीवर आदळून नष्ट झाले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा पहिला देश ठरण्यासाठी रशिया आणि हिंदुस्थानमध्ये चुरस सुरू होती. रशियाच्या अपयशामुळे आता हिंदुस्थानच्या चांद्रयान-3च्या प्रगतीकडे सर्व जगाचे लक्ष लागले आहे.

नेमके काय घडले…

रशियन अंतराळ संशोधन संस्था रोस्कोसमॉसने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री लुना-25 हे यान कक्षा कमी करत चंद्राच्या आणखी जवळ जाणार होते. चंद्रावतरणपूर्व कक्षेतील प्रवेशासाठी यानाची तयारी सुरू असतानाच आवश्यक त्या क्षमतेने इंजिनाचे प्रज्वलन झाले नाही आणि यानाशी संपर्कही खंडित झाला.