
स्थळः रंगशारदा सभागृह, वांद्रे (पश्चिम)
वेळः सकाळी 11 वाजता
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि युवासेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची एकदिवसीय कार्यशाळा शनिवार दि. 2 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे या कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत.
सर्व शिवसेना नेते आणि उपनेते यांची कार्यशाळेला उपस्थिती राहणार आहे. शिवसेनेचे सर्व जिल्हाप्रमुख (महिला आणि पुरुष), जिल्हा संपर्कप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, युवासेना जिल्हा विस्तारक, युवती सेना जिल्हा विस्तारक, जिल्हा संघटक, जिल्हा समन्वयक यांची ही एकदिवसीय कार्यशाळा असेल, अशी माहिती शिवसेना राज्य मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली.























































