
मोदी सरकारने कांद्यावर केलेली 40 टक्के निर्यात शुल्क वाढ व राज्यातील निंदे सरकारने घेतलेली बोटचेपी भूमिका त्यामुळे आज शेतकऱ्यांचे मोठे हाल होताना दिसत आहे. कांद्याचा प्रश्न मोठा अवघड झाला आहे, नगर जिल्ह्यातील बाजार समित्या बंद असल्यामुळे कांद्याची आवक सुद्धा मंदावली आहे. नगर जिल्ह्यामध्ये अवघे एक सेंटर सुरू असून कालपर्यंत 23 शेतकऱ्यांनी आपला कांदा या ठिकाणी दिला आहे. आत्तापर्यंत नगर जिल्ह्यामध्ये 97 टन कांदा जमा झाला असल्याची माहिती नाफेडचे कांदा विभाग प्रमुख सत्यभूषण सुपेकर यांनी सांगितले.
नगर जिल्ह्यामध्ये कांद्याचा प्रश्न गंभीर झाला आहे, बाजार समिती बंद असल्यामुळे कांदा आवक मंदावली गेली आहे. कालच नगरच्या बाजार समितीमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये कांद्याचे लिलाव झाले. काल 2300 भाव मिळाला उद्या आता नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील घोडेगाव या ठिकाणी कांदा लिलाव होणार आहे, त्यामुळे या ठिकाणी किती भाव मिळतो याकडे लक्ष लागले आहे.
केंद्र सरकारने नाफेड मार्फत कांदा खरेदी केली जाईल असे सांगून 24 10 रुपये भाव जाहीर केला. एवढे होऊन देखील सुद्धा नगर जिल्ह्यामध्ये नाफेडची केंद्र नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आलेला आहे. आम्हाला जर केंद्र नसेल तर आम्ही शंभर किलोमीटर नेवासा तालुक्यात जायचे का असा सवाल सुद्धा आता उपस्थित होऊ लागलेला आहे. आमच्या भागामध्ये केव्हा केंद्र सुरू करणार याची विचारणा आता होऊ लागलेली आहे. शेतकऱ्यांनी तशी मागणी सुद्धा केली आहे मात्र प्रशासन याकडे लक्ष द्यायला तयार नाही, दुसरीकडे हवामानामध्ये बदल होऊ लागला आहे त्याचा परिणाम आता सर्वच पिकांवर झाला आहे. त्यातच पाऊस नसल्यामुळे पिके जळू लागलेले आहे शेतामधील उभे पिके आता आडवी झालेली आहे. थोड्याफार प्रमाणामध्ये कांद्याचे पैसे होतील अशी अपेक्षा होती मात्र बाजार समितीमध्ये कांद्याची आवक मंदावल्यामुळे आता शेतकऱ्यांपुढे कांद्याचा विषय हा अधिकच अडचणीचा ठरला आहे .
नाफेड मार्फत कांदा खरेदी होईल अशी शक्यता होती पण नगरमध्ये फक्त नेवासा तालुक्यामध्ये एकच असे केंद्र उभारण्यात आलेले आहे. आत्तापर्यंत नगर जिल्ह्यामध्ये फक्त 97 टन कांदा घेण्यात आलेला आहे.
यासंदर्भात नाफेडचे अधिकारी सातपुते यांनी आम्ही महत्त्वाच्या ठिकाणी केंद्र द्यावेत अशा पद्धतीची मागणी केलेली आहे, नेवासा तालुक्यातील घोडेगाव या ठिकाणी सुद्धा केंद्र व्हावे या दृष्टिकोनातून आम्ही प्रस्ताव तयार केलेला आहे ,असे त्यांनी सांगितले. आजच कर्जत या ठिकाणी आम्हाला मुळेवाडी या ठिकाणी परवानगी मिळाली असल्याची त्यांनी यावेळी सांगितले.


























































