युवक बोलणार… महाराष्ट्र ऐकणार! युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेची प्राथमिक फेरी रविवार, 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 या दरम्यान महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरांमध्ये होणार आहे. स्पर्धेची अंतिम फेरी रविवार, 3 सप्टेंबर रोजी शिवसेना भवन, दादर येथे होईल. 18 ते 35 वयोगटातील स्पर्धक या स्पर्धेत भाग घेऊ शकतात, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली यापूर्वीही अनेकवेळा ‘सडेतोड’ स्पर्धेचे आयोजन केले होते. या ‘सडेतोड’ स्पर्धेमुळे शिवसेनेला चांगले वक्ते मिळाले आणि त्यांनी चौकसभा गाजवल्या, प्रवक्ते मिळाले त्यांनी प्रसारमाध्यमांवर शिवसेनेची भूमिका मांडली. शिवसेनेचा प्रचार, प्रसार आणि युवासेनेचे विचार हे राज्याच्या कानाकोपऱयात पोहचवू शकतात अशा सगळय़ांनी या स्पर्धेचा भाग झाले पाहिजे. महाविद्यालयीन मुले-मुली, शिवसेना-युवासेनेचे पदाधिकारी या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात. ‘सडेतोड’ राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा भाग व्हा आणि महाराष्ट्रात बदल घडवूया, असे आवाहन महाराष्ट्रातील तमाम युवक-युवतींना करण्यात आले आहे.

मुंबई – शिवसेना भवन, दादर पश्चिम, नागपूर – रवी भवन, नागपूर, ठाणे -अनुराधा मंगल कार्यालय, गणेशवाडी, ठाणे (प), पुणे – निर्वाना बँक्वेट हॉल, हॉटेल विवा इन, चांदणी चौक, कोथरूड, नाशिक – शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, शालिमार, संभाजीनगर – शिवसेना भवन, संभाजी पेठ, जिल्हा परिषद मैदानासमोर, नांदेड – शासकीय विश्रामगृह, नांदेड, कोल्हापूर – ज्युनिअर कॉलेज ऑफ न्यू एज्युकेशन सोसायटी, डी. एड. कॉलेज, सोलापूर – मंगळवेढेकर इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट, होम मैदान समोर, यवतमाळ -टिळक स्मारक मंदिर, जळगाव – हॉटेल के. पी. प्राईड, रेल्वे स्टेशनजवळ, रत्नागिरी – शिवसेना कार्यालय, अरिहंत प्लाझा, रत्नागिरी, मुंबई उपनगर – इच्छापूर्ती गणेश मंदिर सभागृह, जोगेश्वरी पूर्व.

वक्तृत्व स्पर्धेकरिता विषय
– व्यंगचित्रकार ते हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे
– शिवसेनेचे हिंदुत्व
– महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे
– अच्छे दिन एक जुमला
– निष्ठा विरुद्ध खोके! विजय कोणाचा ?
– माझा महाराष्ट्र 2035

प्राथमिक फेरी
रविवार, 27 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत