
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शाखा क्र. 9 च्या नवीन भव्यदिव्य शाखेचा उद्घाटन सोहळा शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांच्या हस्ते रविवार, 27 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता गोराई किनारा बिल्डिंग, शिवनेरी, आर.एस.सी. 37, गोराई-2 बोरिवली पश्चिम येथे होणार आहे.
नवीन शाखेच्या उद्घाटन सोहळय़ाच्या प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर, विश्वनाथ नेरुरकर, उपनेत्या संजना घाडी, विभागप्रमुख उदेश पाटेकर, आमदार विलास पोतनीस, आमदार सुनील राऊत, महिला विभाग संघटक सुजाता शिंगाडे यांच्यासह उपविभागप्रमुख पांडुरंग देसाई, उपविभाग संघटक अश्विनी सावंत, विधानसभा संघटक संजय भोसले, कामिनी चव्हाण, विधानसभा समन्वयक विनोद राजेशिर्पे, ममता वेलणकर, उपविधानसभा समन्वयक बाळासाहेब कासार, शाखा संघटक शर्मिला दिवेकर, विशाल पडवळ, विनया भोगले, कार्यालय प्रमुख नितीन कदम आदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती शाखाप्रमुख अमोल बोरकर यांनी दिली.



























































