
हिंदुस्थानात होणाऱया एकदिवसीय वर्ल्ड कपचा आवाज आता घुमू लागलाय. या स्पर्धेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा 4 ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये रंगणार आहे. हिंदुस्थानी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांचा समावेश असलेला हा उद्घाटन सोहळा नेमका कोठे होणार हे अद्यापि स्पष्ट नसले, तरी तो नरेंद्र मोदी स्टेडियमवरच होण्याची शक्यता अधिक आहे.
उद्घाटन सोहळा झाल्यानंतर दुसऱया दिवसापासून अहमदाबादमध्येच गतविजेता इंग्लंड व उपविजेता न्यूझीलंड यांच्यातील लढतीने वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेच्या ‘रन’धुमाळीला प्रारंभ होणार आहे. 19 नोव्हेंबरपर्यंत चालणारी ही स्पर्धा हिंदुस्थानातील 10 शहरांमध्ये आयोजित करण्यात आली आहे. उद्घाटन सोहळय़ात सर्व दहा संघांचे कर्णधार हजेरी लावणार आहेत. आयसीसी आणि बीसीसीआयचे प्रतिनिधी या उद्घाटन सोहळय़ासाठी उपस्थित असतील. 3 ऑक्टोबरपर्यंत सहा संघ दुसऱया शहरांमध्ये सराव सामने खेळणार असल्यामुळे सहा कर्णधार व्यस्त असणार आहेत. त्यामुळे या संघांच्या कर्णधारांना आपापले सामने संपताच अहमदाबादकडे उड्डाण करावे लागणार आहेत. इतर चार संघांचे कर्णधार 4 ऑक्टोबरला सकाळीच अहमदाबादमध्ये दाखल होतील. या स्पर्धेत एपंदर 58 सामने खेळले जाणार असून यात दहा सराव सामन्यांचाही समावेश आहे. या स्पर्धेच्या लढती दहा मैदानांवर खेळविल्या जाणार असून हैदराबाद वगळता अन्य नऊ मैदानांवर हिंदुस्थान आपले साखळी सामने खेळणार आहे.



























































