
मी आठ दिवस झाले टँकर मागत आहे, मात्र मी मागणी केलेल्या गावाला टँकर मिळत नाही, आता तरी टँकर द्या, अशी मागणी करण्याची वेळ सत्ताधाऱयांवरच आली आहे. सध्या कर्जत-जामखेड पाणीप्रश्न भीषण झाला आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दोन दिवसांमध्ये टँकर सुरू करा, असे आदेश दिले.
कर्जत -जामखेड पाणीप्रश्न गंभीर झाला असून, पाण्यासाठी टँकर मागण्याची वेळ भाजप आमदारांवर आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत यावर चर्चा झाली. यावेळी पालकमंत्र्यांनी टँकर देण्याचे आदेश दिले. पण, यावेळी जनावरांसाठी जिह्यामध्ये चारा डेपो तयार केला जाईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार बबनराव पाचपुते, राम शिंदे, किरण लहमते, अशोक काळे, लहू कानडे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, आयुक्त पंकज जावळे आदी यावेळी उपस्थित होते.



























































