
गावागावात होऊ द्या चर्चाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या फसव्या घोषणा आणि आश्वासनांचा भांडाफोड करावा असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे संपर्क प्रमुख रोहिदास चव्हाण यांनी सांगितले. रेणापूर तालुक्यात होऊ द्या चर्चा या कार्यक्रमात बोलताना रोहिदास चव्हाण बोलत होते. यावेळी जिल्हा प्रमुख बालाजी रेड्डी आणि पदाधिकारी उपस्थित होते. शिवसैनिकांनी पद घेतले तर पदाला न्याय दिला पाहिजे. न्याय देता येत असेल तरच पद घेऊन ठेवावे नाहीतर पदाचा राजीनामा देऊन शिवसैनिक म्हणून काम करावे. शिवसेना शाखेच्या माध्यमातून गावातील सार्वजनिक काम करण्यास सर्वात जास्त पदाधिकाऱ्यांनी प्राधान्य दिले पाहिजे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत कशी ताब्यात घेता येईल यासाठी जिद्दीने काम केलं पाहिजे. होऊ द्या चर्चा ही प्रत्येक गावागावात राबवावी असे ही त्यांनी सांगितले.
शिवसेना जिल्हा प्रमुख बालाजी रेड्डी यांनी जुने शिवसैनिक व नव्या शिवसैनिकांनी जिद्दीने काम करावे. त्यांना योग्य न्याय दिला जाईल. जिल्हा परिषद पंचायत समिती आपणाला कसे ताब्यात घेता येईल यासाठी जिद्दीने कामाला लागा. पक्षाच्या आदेशाची वाट न पाहता सामाजिक कार्यात सर्वांनी सहभाग घेऊन पक्ष वाढवावा असे सांगितले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब डोंगरे तालुकाप्रमुख हरिभाऊ साबदे माजी सैनिक सूर्यकांत चव्हाण, हनुमान जाधव, अनिल फुलारी, संजय सुडे, धर्मराज देशमुख, शिवाजी माने, संजय इगे, आबा गरड, बालाजी कागले, गणपत जाधव, परमेश्वर माने, पप्पू माने, संजय निवृत्ती बंडापल्ले, किरण जाधव, रामकृष्ण अक्कनगिरे, पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



























































