
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने ‘होऊ द्या ‘चर्चा’ हा कार्यक्रम चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर तालुक्यातील नवेगाव (पांडव ) येथे उपजिल्हाप्रमुख प्रशांत कोल्हे यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आला होता. यावेळी कोल्हे यांनी केंद्र सरकारच्या फसव्या आश्वासनाची पोलखोल करत हे सरकार युवकांना बेरोजगार करणार, शेतकरी, कष्टकरी, कामगार विरोधी धोरणे अवलंबनार सरकार असल्याचं म्हणत संताप व्यक्त केला.
होऊ दे चर्चा कार्यक्रमाच्या निमित्ताने नागरिकांशी संवाद साधताना केंद्र सरकार व राज्यातील मिंधे सरकार यांनी दिलेले कुठलेही आश्वासन पूर्ण न केल्याचे म्हणत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी कार्यक्रमाला चिमूर- गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे संपर्कप्रमुख महेश केदारी, उपजिल्हा प्रमुख प्रशांत कोल्हे, युवासेना उपजिल्हाप्रमुख नाझीम शेख, विधानसभा संघटक भाऊराव डांगे, तालुका प्रमुख बंडू पांडव, शहर प्रमुख अमित अमृतकर, विक्की मडकाम, ईश्वर ठाकरे, भैय्याजी कारेकार व शिवसैनिक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


























































