
कैद्यांना त्यांचे खासगी पैसे व कामाच्या मोबदल्यात मिळणारा मेहनताना याद्वारे जमा असलेल्या रकमेतून एकूण खर्चाच्या रकमेची मर्यादा वाढविण्याचा निर्णय कारागृह प्रशासनाने घेतला आहे.
सध्या उपाहारगृहातून खरेदीसाठी कैद्यांना सहा हजार इतकी खर्चाची मर्यादा आहे. ती मर्यादा आता दहा हजार इतकी खर्च करण्याची परवानगी 1 नोव्हेंबरपासून करण्यात आली आहे. कारागृह विभागाचे अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या अधिकाऱयांच्या बैठकीत कारागृहातील कैद्यांना त्यांचे खासगी पैसे व कामाच्या मोबदल्यात मिळणारा मेहनताना याद्वारे त्यांच्या नावे जमा असलेल्या रकमेतून उपाहारगृहामधून दैनंदिन गरजेच्या वस्तू, साहित्य, खाद्यपदार्थ खरेदीकरिता एकूण खर्चाच्या रकमेतील मर्यादेत वाढ करण्यात आली आहे.

























































