
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळत आहे. प्रसारमाध्यमांनी या संदर्भात वृत्त प्रसारित केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून हवाई रुग्णवाहिकेची सोय करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्या रुग्णवाहिकेतून त्यांना उपचारासाठी मुंबईत दाखल केले जाणार आहे. दुपारच्या सुमाराला खडसे यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना त्वरित स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता हवाई रुग्णवाहिकेतून त्यांना मुंबईत आणलं जाणार आहे.





























































