नेट अभ्यासक्रमात यूजीसी करणार बदल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्राध्यापक पदासाठी आवश्यक असलेली राष्ट्रीय पात्रता परीक्षेच्या (यूजीसी नेट) अभ्यासक्रमात बदल करण्याचा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) घेतला आहे. यूजीसीचे अध्यक्ष एम. जगदीश कुमार यांनी सांगितले, अभ्यासक्रम बदलासाठी यूजीसी तज्ञांची समिती स्थापन करणार असून नव्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा घेण्यापूर्वी परीक्षार्थ्यांना पुरेसा वेळ देण्यात येईल. प्राध्यापक पदासाठी इच्छुक उमेदवारांना यूजीसी नेट परीक्षा अनिवार्य आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने  2017 मध्ये यूजीसी नेट परीक्षेतील विषयांचा अभ्यासक्रम अद्ययावत करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली होती. वर्ष 2020 मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आल्यानंतर बहुविद्याशाखीय अभ्यासक्रम आणि सर्वांगीण शिक्षण देण्यासाठी उच्च शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल झाले. त्यामुळे आयोगाने यूजीसी नेट परीक्षेचा अभ्यासक्रमही अद्ययावत करण्याचा निर्णय घेतला. विद्यापीठ अनुदान आयोग नॅशनल टेस्टिंग एजन्सी ज्युनियर रिसर्च फेलोशिपसाठी  (जेआरएफ) यूजीसी-राष्ट्रीय पात्रता चाचणी आयोजित करते.