
पूर्वी ट्विटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि आता X नावाने प्रसिद्ध सोशल मीडिया मंचावर काहीच दिसेनासं झालं आहे. पैसे भरून सेवा न घेतल्याने ही समस्या निर्माण झाली आहे का असं काही लोकांच्या मनात आलं, मात्र जेव्हा त्यांनी इंटरनेटवर शोधाशोध सुरू केली तेव्हा त्यांना X बंद पडल्याचं कळालं. X आणि X Pro या दोन्ही सेवा बिघाडामुळे ठप्प झाल्या आहेत. या बिघाडामुळे वापरकर्त्यांना ना स्वत:च्या पोस्ट दिसत होत्या ना इतरांच्या. सकाळी 11 वाजेपासून ही समस्या निर्माण झाली असून जगभर X ठप्प झालं आहे. या बिघाडामुळे नव्या पोस्ट शेअर करता येत नाहीये. मोबाईल आणि कॉम्प्युटर दोन्ही ठिकाणी ही समस्या दिसून आली आहे.
























































