
मुंबई-बंगळुरू महामार्गावरील कात्रज नवीन बोगद्यात शुक्रवारी दुपारी अपघात होवून पाच वाहने एकमेकांवर आदळली. बोगद्यात दुरुस्तीचे काम सुरू आहे. यातच पुढील एका कारचालकाने अचानक कार थांबविली. त्यामुळे पाठीमागून वेगाने आलेली वाहने त्यावर आदळली. घटनेमुळे वाहतूक विस्कळीत झाली होती.
नकीन कात्रज बोगद्यात शुक्रवारी दुपारी दुरस्तीचे काम सुरू होते. त्यावेळी साताऱयाकडून पुण्याकडे निघालेली एक कार अचानक थांबली. त्यापाठोपाठ पाठीमागून येणाऱया वाहने त्यावर आदळली. अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले झाले असून घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. अपघातग्रस्त वाहने बाजूला काढण्यात आल्यानंतर अर्धा तासानंतर वाहतूक सुरळीत झाली. अपघातामध्ये कुणीही जखमी नाही, अशी माहिती भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली.


























































