
गेल्या दोन्ही सामन्यांत अफगाणिस्तानविरुद्ध सहा विकेटनी विजय मिळवणाऱया हिंदुस्थानने टी-20 सामन्यांची मालिका जिंकलीच आहे. आता तिसरा सामनाही जिंकत अफगाणिस्तानविरुद्ध ‘धुव्वा’दार मालिका विजयाची नोंद करण्यासाठी हिंदुस्थान सज्ज झाला आहे.
पहिल्या दोन्ही सामन्यांत शिवम दुबेचा धमाका आणि सहा विकेटस्नी विजय या दोन गोष्टी पाहायला मिळाल्या होत्या. तिसऱया सामन्यातही जोरदार खेळ करत शिवम हॅटट्रिक करण्यास उत्सुक आहे. तसेच उद्या संघात कुलदीप यादव आणि आवेश खानलाही चेंडू हाताळण्याची संधी मिळू शकते. तसेच कर्णधार रोहित शर्माला आपल्या भोपळय़ाची पाठ मोडीत काढण्यासाठी खेळपट्टीवर उभे राहावेच लागेल. अन्यथा त्याच्याकडे सोपवण्यात आलेल्या टी-20 च्या नेतृत्वाबाबत साशंकतचे वातावरण निर्माण होऊ शकते. रोहितकडून चिन्नास्वामीवर हिटमॅनला साजेशा खेळीची अपेक्षा आहे. दोन्ही सामन्यांत बेंचवर बसलेला कुलदीप यादव रवी बिश्नोईची, तर आवेश खान मुकेश कुमारच्या जागी खेळू शकतो. तसेच जितेश शर्माला विश्रांती देत संजू सॅमसनच्या हातात ग्लोव्हज्ही घातले जाऊ शकतात. हिंदुस्थानने मालिका जिंकली असल्यामुळे अखेरचा सामना सर्वांना संधी देण्याचा असणार आह
ऐताना बोनमती सर्वोत्तम
क्लब आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या सर्वोत्तम हंगामानंतर स्पेनच्या ऐताना बोनमतीला 2023 सालचा ‘सर्वोत्तम महिला फुटबॉलपटू’चा पुरस्कार फिफाने जाहीर केला. 25 वर्षीय मिडफिल्डर असलेल्या ऐतानाच या पुरस्काराची खरी दावेदार होती. तिनेच 2023 साली स्पेनला पहिले जगज्जेतेपद जिंकून दिले होते. त्यानंतर बार्सिलोनाला राष्ट्रीय आणि युरोपियन जेतेपद जिंकून देण्याचा पराक्रमही केला होता.

























































