बिहारचा इंडिया आघाडीवर परिणाम नाही; रमेश चेन्निथला यांना विश्वास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अचानक भूमिका बदलली, राजकारणात विश्वास महत्त्वाचा असतो तो नितीश कुमार यांनी गमावला असून ते देशातील सर्वात मोठे पलटूराम झाले आहेत. नितीश कुमार यांच्या जाण्याने इंडिया आघाडीवर परिणाम होणार नाही. केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार आणू, असा विश्वास काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी व्यक्त केला.

बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल व काँग्रेस पक्षाने मागील निवडणुका एकत्रितपणे लढवल्या होत्या, आताही काँग्रेस व राजद मिळून निवडणुका लढवतील व बिहारमध्ये सर्वात जास्त जागी विजय मिळवू. नितीश कुमार यांची विचारधारा काय आहे व आदर्श काय आहेत, हे जनतेला समजले आहे. जनतेचा इंडिया आघाडीवर विश्वास असून या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असेही ते म्हणाले.

भाजपमुक्त महाराष्ट्र
महाराष्ट्रातील सर्व 48 जागा महाविकास आघाडी मिळून लढणार आहे. जागा वाटपाबाबत कोणतेही मतभेत नाहीत, सर्व घटक पक्षांना सोबत घेऊन ही निवडणूक लढवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.