
खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर (73) यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. अवघ्या वयाच्या 19 व्या वर्षी ते गावचे सरपंच झाले. त्यानंतर जिल्हा परिषदमध्ये त्यांनी अनेक वर्षे काम केले. जिल्हा परिषदमध्ये बांधकाम सभापती म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. त्यानंतर 1990 मध्ये ते प्रथम विधानसभेवर निवडून गेले. टेंभू योजनांच्या माध्यमातून मतदारसंघात पाण्याचे दुर्भिक्ष्य संपावे यासाठी त्यांनी अखेरपर्यंत प्रयत्न केले. आज त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात त्यांच्या मूळ गावी गार्डी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.



























































