किस्से आणि बरंच काही- टीव्ही मालिका बेचव… अर्थहीन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> धनंजय साठे

टीव्ही मालिकांच्या बाबतीत एक काळ असा होता जेव्हा सकस आशय आणि दर्जा याला महत्त्व दां जात होतं. परंतु 90 चं दशक सरता सरता साधारण 2005 पासून दैनंदिन मालिकांचं पर्व सुरू झालं आणि सास–बहू मालिकांची रणधुमाळी सुरू झाली. या रणधुमाळीत ‘वाद’ नावाचा शत्रू आपल्या घरात, मग आपल्या आयुष्यात घुसला. कंटिन्युटी ओव्हर क्वॉलिटी हे सत्य दर्शवणारी सध्याची स्थिती प्रेक्षकांच्या मागणीशिवाय बदलणार नाही.

माझ्या टीव्ही कारकिर्दीची सुरुवात तब्बल 24 वर्षांपूर्वीची. तो साप्ताहिक मालिकांचा काळ होता. नीना गुप्तांच्या प्रॉडक्शन कंपनीमधून ‘साँस, सिसकी, सोनपरी, क्यू होता है प्यार, सांझी…’ या मालिका स्टार प्लस आणि झीसारख्या देशाच्या सगळ्यात लोकप्रिय वाहिन्यांवर झळकल्या. ज्या आजही लोकांच्या स्मृतीत घर करून आहेत. त्यामुळे कलेचा उत्तम आविष्कार ज्यात सकस आशय-विषय असलेल्या मालिका पाहिलेल्या माझ्यासारख्याला आजच्या मालिका पाहताना अनेक प्रश्न पडतात. एकेकाळी अत्यंत गाजलेली  ‘तारा’सारखी एक मालिका. ज्यात स्त्रियांना त्यांच्या आयुष्यात भोगावी लागणारी दु:खं, त्यांची होणारी मानसिक ओढाताण, त्यातून होणारी मानसिक गुंतागुंत अशा सामाजिक विषयांभोवती फिरणारी मालिका पाहिलेला मी आजकाल घरातल्या सुनेचं एका डासामध्ये झालेलं रूपांतर पाहतो तेव्हा माझ्या अंगावर काटा येतो हो…!

दूरदर्शनची जेव्हा सुरुवात झाली ती सरकारी विभागाअंतर्गत. त्यामुळे त्यांचा कारभार सरकारी यंत्रणेवर चालायचा. तेव्हा इतके अप्रतिम मराठी कार्पाम दाखवले जायचे आणि त्यांचा काय अलौकिक दर्जा होता. एक से बढकर एक विषयांवरच्या मालिका व कार्पाम दाखवले जायचे. मग ते चिमणराव-गुंड्याभाऊ असो किंवा ज्ञानदीप, किलबिल, पिंपळपान असो, दर्जा कायम होता. हिंदीमध्येसुद्धा रामायण, महाभारत, हमलोग, बुनियाद, भारत एक खोज, ये जो है जिंदगी, रजनी, फौजी यांसारख्या मालिका आजही विस्मरणात गेलेल्या नाहीत. इतके प्रेक्षक त्यात गुंतले होते. मग असं काय झालं की ज्यामुळे हा दर्जा का व कसा घसरला?

तर माझ्या मते, तेव्हा टीव्ही सगळ्यांकडे नसायचा. त्यामुळे टीव्हीचा प्रेक्षकवर्ग आजच्या एवढा मोठा नव्हता. दूरदर्शन हे माध्यम सरकारी नियंत्रणात होतं. त्या कक्षेत काम करताना संपूर्ण कुटुंब आनंद घेतील अशा कौटुंबिक मालिका, संरक्षण दलात सामील होण्यासाठी तरुणांना प्रेरणा देणाऱया मालिका, आपली कुटुंबपद्धती, संस्कृती जपणाऱया ‘हमलोग’सारख्या मालिका त्याकाळी प्रसारित होत होत्या. परंतु नव्वदीच्या दशकापासून चित्र बदलत गेलं. खाजगीकरण झालं आणि झी, सोनी, स्टारसारख्या वाहिन्यांनी मोठ्या दिमाखात प्रवेश करायला सुरुवात केली. आर्थिक गणितं व समीकरणं बदलली. मोठ्या कंपन्या त्यांच्या जाहिरातीसाठी मोठमोठी बजेट्स आखायला लागल्या आणि बघता बघता आर्थिक गुंतवणुकीचा आणि उलाढालींचा खेळ सुरू झाला.

शहरी प्रेक्षक वर्गाचं प्रमाण मोठं होतं. मग त्यांना रुचणाऱया, पटणाऱया शहरी बाज असणाऱया कार्पामांना प्राधान्य मिळायला लागलं. तशा प्रकारचे कार्पाम जास्त प्रमाणात बनायला लागले. उदाहणार्थ ‘देख भाई देख’सारखी अस्सल विनोदी मालिका, ‘साँस’सारखी संवेदनशील मालिका, लहान मुलीच्या आयुष्यात आलेली स्वप्ननगरीतली परी म्हणजेच ‘सोनपरी’सारखी मालिका… या सगळ्या मालिका दर्जेदार होत्या.

त्या दशकाचा फायदा हाही होता की, अनेक उत्तम दिग्दर्शक, निर्माते व कलाकार टीव्हीवर काम करायला उत्सुक असायचे. कालांतराने टीव्हीचा प्रसार झा. टीव्ही बघणारा प्रेक्षक वाढायला लागला. तसं साप्ताहिक मालिकांची जागा दैनंदिन मालिकांनी घेतली आणि इथेच पहिली ‘खतरे कि घंटी’ वाजली. सगळंच बदललं. सर्वच आघाड्यांवर कामाचा व्याप वाढला. लेखकांना जिथे आठवड्याला एक एपिसोड लिहून द्यावा लागायचा तिथे  आठवड्याला चार तर सध्या आठवड्याचे सहा एपिसोड लिहून द्यावे लागतात. त्यामुळे दिग्दर्शकावर प्रचंड दडपण येतं. कारण त्याला दररोज एक एपिसोड द्यावाच लागतो. कलाकारांवरही त्याचा ताण पडतो आणि निर्मात्यांनाही आपल्या आर्थिक तसंच मानसिक स्वास्थ्याकडे अधिक लक्ष द्यावं लागतं. कंटिन्युटी ओव्हर क्वॉलिटी हे परखड सत्य पचवावं लागतं.

90 चं दशक सरता सरता साधारण 2005 पासून दैनंदिन मालिकांचं पर्व सुरू झालं आणि सास-बहू मालिकांची रणधुमाळी सुरू झाली. ‘वाद’ नावाचा शत्रू आपल्या घरात, मग आपल्या आयुष्यात घुसला. कारण जितकं नकारात्मक पाहाल तितका नकारात्मक प्रभाव मनावर पडतो. वादविवाद वाढतात. या बाबतीत मी म्हणेन की त्याहीपेक्षा अनेक पटीने जास्त मोठा गुन्हेगार टीव्ही पाहणाऱया असंख्य मंडळींचे नातेसंबंध बिघडवणाऱया आणि त्यांच्या  विचारांना खतपाणी घालणाऱया या टीव्ही मालिका असतात. हे विधान मी सरसकट करत नाही. तर सर्वसाधारणपणे जे काही मालिकाविश्वात पाहायला मिळतं त्यावरून काढलेला हा निष्कर्ष आहे.

टीव्हीसाठी लिहिणारे उत्तम लेखक नाहीत का? तर तसं नाही, अनेक उत्तम लिहिणारे लेखक आहेत. पण त्यांच्या विचारांना आणि त्यांच्या लेखणीला वाव मिळेल असा माहौल निर्माणच होऊ देत नाहीत. कारण अधिकाराचं वर्चस्व गाजवणाऱया क्षेत्रात काहीजण बसलेले आहेत. ज्या कामाला वेळ द्यावा लागतो तिथे वेळेचं बंधन आणून घाईघाईत काम उरकून घेतल्यामुळे त्याचा फटका दर्जावर  बसणारच. प्रेक्षकांना काय दाखवू शकतो, त्यांना काय आवडेल यापेक्षा दिग्दर्शकाचं सगळं लक्ष ट्रक किती आणि कसा मिळवायचा याकडे केंद्रित झाल्याने सगळीच बोंब आहे.

एकूण काय, तर जनसामान्य प्रेक्षकांनी थोडा दृष्टिकोन बदलावा. चांगले दर्जेदार कार्पाम बघण्याची स्वत:ला सवय लावावी.  कारण जोपर्यंत प्रेक्षक आपल्या सवयी बदलणार नाहीत तोपर्यंत समाजाला मागे नेणारा नीरस, अर्थहीन कॉन्टेंटला मरण नाही.

[email protected]

(लेखक क्रिएटिव्ह हेड, अभिनेते आणि गायक आहेत.)