
अहमदनगर जिह्याचे नामकरण अहिल्यानगर करण्यास मंत्रिमंडळाने आज मान्यता देण्यात आली. अहमदनगर जिह्यातील चौंडी हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव आहे. त्यामुळे नगरचे नाव बदलण्याची मागणी अनेक लोकप्रतिनिधी, नागरिक व संघटनांनी केली होती. यासंदर्भात नगर महानगरपालिका प्रशासनाने ठराव करून तो राज्य शासनाकडेही पाठवला होता. आता केंद्राची मान्यता मिळाल्यानंतर अहमदनगर जिल्हा, तालुका तसेच महानगरपालिका यांच्या नामांतरणाची कार्यवाही महसूल व नगर विकास विभागाकडून करण्यात येणार आहे.
वेल्हे तालुक्याचे नाव राजगड
पुणे जिह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव राजगड करण्यास वेळोवेळी लोकप्रतिनिधी यांनी यासंदर्भात मागण्या केल्या होत्या. स्थानिक लोकभावना आणि वेल्हे तालुक्यातील ग्रामपंचायतींनी केलेले ठराव लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.


























































