दिल्लीमध्ये मुलांच्या तस्करीचे मोठ्या रॅकेटचा सीबीआयने भंडाफोड केला आहे. सीबीआयने या प्रकरणी दिल्ली हरियाणा येथील आठ ठिकाणांवर छापेमारी केली आहे. तसेच एका घरातून तीन नवजात बालकांना ताब्यात घेत त्यांची सुटका केली आहे. या नवजात बालकांना प्रत्येकी पाच लाख रुपयात विकले जाते अशी धक्कादायक माहिती समोर आली असून ही सर्व मुलं हॉस्पिटलमधून पळवलेली असल्याचे समजते.
या प्रकरणाचा तपास आता अनेक राज्यांपर्यंत पोहोचला असून तेथील रुग्णालयात देखील चौकशा सुरू आहेत. देशातील अनेक प्रमुख रुग्णालयं या चौकशीच्या फेरीमध्ये अडकत आहेत. या प्रकरणी सीबीआयने एफआयआर दाखल केली असून अनेक ठिकाणी छापेमारी सुरू आहे.