राष्ट्रीय जनता दलाने आज त्यांची लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादित लालू प्रसाद यादव यांच्या दोन्ही मुलींची नावे आहे.
लालू प्रसाद यादव यांची मोठी मुलगी मिसा भारती हिला पाटलीपुत्र येथून तिकीट देण्यात आले आहे. तचर रोहिणी आचार्य हिला सारण मतदारसंघातून रिंगणात उतरवण्यात आले आहे.राजद बिहारमधील 40 लोकसभा मतदारसंघांपैकी 26 जागा लढत असून उर्वरित नऊ जागा काँग्रेस व पाच जागा डाव्या पक्षांना सोडण्यात आल्या आहेत
रोहिणी यांनी लोकसभा निवडणूक प्रचाराला सोनीपूर येथील पहेलझा घाट येथून सुरुवात केली आहे. माझ्या आई-वडिलांना, भावांना जनतेने प्रचंड प्रेम दिले, तेच प्रेम मला मिळत आहे. जनतेचे हे ऋण मी कधीच फेडू शकणार नाही, परंतु शेवटच्या श्वासापर्यंत जनतेची सेवा करेन. मी माझ्या वडिलांना किडनी दिली, पण जनतेसाठी प्राणही द्यायला तयार आहे, असे रोहिणी आचार्य म्हणाल्या होत्या.
राजदचे प्रमुख उमेदवार
रोहिणी आचार्य (सारण)
मिसा भारती (पाटलीपुत्र)
सुधाकर सिंह (बक्सार)
अली अश्रफ फातमी (मधुबनी)
सुरेंद्र प्रसाद (जेहानाबाद)