आरटीई प्रवेशाला यंदा भरघोस प्रतिसाद; प्रवेश क्षमतेपेक्षा प्रवेश अर्ज जास्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिक्षण हक्क कायद्यानुसार 25 टक्के कोटय़ाअंतर्गत सुरू असलेल्या आरटीई प्रवेशाला यंदा विद्यार्थी- पालकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. आरटीईच्या 1 लाख 4 हजार 687 जागांसाठी तब्बल 1 लाख 30 हजारांहून अधिक अर्ज आले आहेत. प्रवेश अर्ज करण्यासाठीची मुदत 31 मे रोजी संपणार असून येत्या दहा दिवसांत प्रवेश अर्जात आणखी भर पडणार आहे. त्यामुळे यंदा आरटीईअंतर्गत शाळा प्रवेशासाठी मोठी चुरस पहायला मिळणार आहे.

आरटीईअंतर्गत शाळा प्रवेशासाठी प्रत्येक जिह्यातून प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त अर्ज आले आहेत. त्यामुळे यंदा मोठय़ा प्रमाणावर प्रवेशावेळी स्पर्धा होणार आहे. लॉटरी पद्धतीने आरटीईची प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येते. लॉटरीत नाव आल्यावर विद्यार्थ्याने दिलेल्या मुदतीत संबंधित शाळेत जाऊन योग्य कागदपत्रांसह प्रवेश घेणे आवश्यक आहे. प्रवेशफेरी पार पडल्यानंतरही जे विद्यार्थी प्रवेश घेणार नाहीत अशा रिक्त जागांवर प्रतीक्षा फेरीअंतर्गत प्रवेश केले जाणार आहेत. यंदा आरटीई प्रवेशाच्या दोन सोडती जाहीर होण्याची शक्यता असून या फेरीनंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणार आहे.