
पुणे जिल्ह्यात सततधार कोसळणाऱ्या पावसामुळे पाणी शिरले होते. या परिस्थितीत अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी व जवानांनी पाणी शिरलेल्या घटनास्थळी अडकलेल्या नागरिकांना धीर देत त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. आतापर्यंत अग्निशमन दलाने जवळपास 160 नागरिकांची सुखरुप सुटका केली असून त्यांनी सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. बोट, रस्सी, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग असे विविध साहित्याचा वापर करत रात्रीपासून जवळपास दोनशे फायरमन कार्यरत आहेत.