
घोडबंदर रोडवरील पाटलीपाडा ब्रिज जवळ 26 टन एशियन पेंट कलर घेऊन जाणारा ट्रक उलटल्याची घटना शुक्रवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. सकाळच्या सुमारास ही घटना घडल्याने त्याचा वाहतुकीवर चांगलाच परिणाम झाल्याचे पाहण्यास मिळाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी तो ट्रक रस्त्याच्या एका बाजूला केल्यानंतर तो रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला अशी माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.