कांदा निर्यातबंदीने लोकसभेला झटका दिला… आता माफी मागतो; अजित पवारांची कबूली

कांदा निर्यातबंदीमुळे लोकसभेत जोरदार झटका बसल्याची कबूली राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. तसेच लोकसभे आधी केंद्र सरकारने केलेल्या कांदा निर्यातबंदीसाठी त्यांनी शेतकऱ्यांची माफी देखील मागितली आहे.

अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा गुरुवारपासून सुरू झाली असून शुक्रवारी नाफेड येथे अजित पवारांची सभा झाली. या सभेत बोलताना अजित पवार यांनी कांदा निर्यातबंदीचा लोकसभेत जोरदाऱ फटका बसल्याची कबूली दिली. ”आम्ही केंद्र सरकारला सांगितलं आहे की कांदा निर्यातबंदी करायची नाही. मी देखील वरिष्ठांच्या भेटी घेतल्या आहेत. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी देखील अनेकांच्या भेटी घेतल्या असून सगळ्यांचे एकमत झाले आहे. कांदा निर्यातबंदीने आपल्याला लोकसभेला जो झटका दिला तो खूप लागला आहे. त्याने पार कंबरडं मोडायची वेळ आली. माफ करा. चूक झाली. मान्य करतो”, असे अजित पवार म्हणाले.