तिरंग्यावर चाँद तारा, बिहार आणि राजस्थानमध्ये पाच जणांना अटक

तिरंग्याशी काही जणांनी छेडछाड केली आहे. तिरंग्यावर अशोक चक्राऐवजी चाँद तारा लावण्यात आला होता. त्यामुळे बिहार आणि राजस्थानमध्ये पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

बिहारच्या सारण जिल्ह्यात ईद ए मिलाद निमित्त मिरवणूक निघाली होती. या मिरवणुकीत तिरंगाही फडकावण्यात आला. पण या तिरंग्यावर काही ठिकाणी अशोक चक्र ऐवजी चाँद तारा लावण्यात आला होता. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच गदारोळ झाला. पोलिसांनी या घटनेची दखल घेत गुन्हा दाखल केला. तसेच या प्रकरणी दोघांना अटक केली आहे.

दुसरीकडे राजस्थानमध्येही अशीच घटना घडली आहे. राजस्थानच्या कोटामध्ये ईद ए मिलाद निमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. इथेही मिरवणुकीत तिरंगा फडकावला गेला, पण तिरंग्यात अशोक चक्र ऐवजी चाँद तारा लावण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हे दाखल करून तीन जणांना अटक केली आहे.