
मॅट्रीमोनियल साईटवर मुलींना लग्नाचे आमिष दाखवत लुटणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीने IIM बंगळुरुमधून पासआऊट केले असून विप्रो कंपनीत रिजनल मॅनेजर म्हणून 1.37 लाख पगारावर कार्यरत होता. राहुल चतुर्वेदी असे आरोपीचे नाव आहे.
राहुलचे वडील निवृत्त कर्नल असून त्यांचे 2007 मध्ये निधन झाले आहे. आरोपी आधी मॅट्रीमोनियल साईटवर प्रोफाईल बनवायचा आणि आपण विप्रो कंपनीचा रिजनल मॅनेजर असल्याचे सांगायचा. मॅट्रीमोनियल साईटवर मुलींसोबत मैत्री करायचा. त्यांना लग्नाचे आमिष दाखवून मुलींकडून महागड्या वस्तू घ्यायचा.
आपल्यावर विश्वास बसावा म्हणून आरोपी मुलींच्या नातेवाईकांनाही भेटायचा. एका तरुणीने आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला. पोलिसांनी आरोपीचा कसून शोध घेत त्याला बेड्या ठोकल्या. यानंतर आरोपीची चौकशी केली असता सर्व धक्कादायक प्रकार उघडकीस आला. आरोपी 2022 पासून मुलींचा फसवणूक करत होता.