
मुसळधार पावसाने बुधवारी मुंबईला अक्षरश: झोडपून काढले. अनेक ठिकाणी पाणी साचले होते. अशातच मुंबईतील अंधेरी पूर्व येथील मॅनहोलमध्ये पडून एका 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. या घटनेवरून आता शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) हल्लाबोल केला आहे. तुमचा निष्काळजीपणा अजून किती मुंबईकरांचे जीव घेणार? असा संतप्त सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने एक्सवर पोस्ट शेअर करत मिंधे सरकारला केला आहे.
शिवसेनेने शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हंटले आहे की, भाजप-मिंधे सरकार आणि मुंबई महानगरपालिका सातत्याने मुंबईकरांच्या जीवाशी खेळ करत आहेत. मुंबई तुंबली असताना पाण्याचे उपसा करणारे पंप सुरू नव्हतेच. पण मॅनहोलही उघडे ठेवण्यात आले होते. त्या ठिकाणी सावधगिरीची सूचना देणारे फलकही नव्हते. शिवाय तिथे मार्गदर्शन करण्यासाठी पालिकेचे कर्मचारीही उपस्थित नव्हते. पालिका प्रशासनाचा हा गलथान कारभार एका महिलेच्या जीवावर बेतलाय. मिंधे सरकार यावर कोणती कारवाई करणार, याकडे आता मुंबईकरांचे लक्ष लागून राहिले आहे, असे शिवसेनेने म्हटले आहे.
भाजप-मिंधे सरकार आणि मुंबई महानगरपालिका सातत्याने मुंबईकरांच्या जीवाशी खेळ करत आहेत. मुंबई तुंबली असताना पाण्याचं उपसा करणारे पंप सुरु नव्हतेच पण मॅनहोलही उघडे ठेवण्यात आले होते. त्या ठिकाणी सावधगिरीची सूचना देणारे फलकही नव्हते. शिवाय तिथे मार्गदर्शन करण्यासाठी पालिकेचे… pic.twitter.com/67DTQxEFSG
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) September 26, 2024