Mexico accident – मॅक्सिकोमध्ये भीषण अपघात, 24 जणांचा मृत्यू तर 5 जण गंभीर जखमी

मॅक्सिकोमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये 24 लोकांचा मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी झाले आहेत.

हा अपघात मॅक्सिकोमध्ये झाला आहे. शनिवारी सकाळी मॅक्सिकोच्या जाकाटेकास राज्यात महामार्गावर बस आणि ट्रॅक्टर ट्रेलरमध्ये जबरदस्त धडक झाली. या भीषण अपघातात बस पलटी होऊन महामार्गाच्या खाली गेली. मिळालेल्या माहितीनुसार, ही बस नायरिट राज्यातील टेपिक येथून चिहुआहुआ राज्यातील सिउदाद जुआरेजला जात होती,मात्र वाटेत अपघात झाला.

मॅक्सिकोच्या जाकाटेकास राज्यात झालेल्या या अपघातात बसमध्ये प्रवास करणाऱ्या 24 जणांचा मृत्यू झाला. काही जणांचा जागीच मृत्यू झाला, तर काहींनी रुग्णालयात किंवा रुग्णालयात नेत असतानाच अखेरचा श्वास घेतला. या अपघातात 5 जण जखमी झाले आहेत जखमींना उपचारासाठी जाकातेकास येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी काहींना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, मात्र काही लोकांवर अजूनही उपचार सुरू आहेत.