
श्रीलंकेने ताब्यात घेतलेल्या मच्छीमारांची लवकरात लवकर सुटका करावी, असे आवाहन करताना हिंदुस्थानने या समस्येचे निराकरण करण्यासाठी मानवतावादी आणि रचनात्मक दृष्टिकोनावर जोर दिला. अलीकडेच श्रीलंकेच्या नौदलाने सांगितले की, त्यांनी श्रीलंकेच्या सागरी सीमेत मासेमारी केल्याप्रकरणी या वर्षी आतापर्यंत 537 हिंदुस्थानी मच्छीमारांना अटक केली आहे. हिंदुस्थानी उच्चायुक्त संतोष झा यांनी आज श्रीलंकेचे मत्स्यव्यवसाय, जल आणि महासागर संसाधन मंत्री रामलिंगम चंद्रसेकर यांची भेट घेतली. ‘मच्छीमारांच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी मानवतावादी आणि रचनात्मक दृष्टिकोनावर भर दिला. अटकेत असलेल्या हिंदुस्थानी मच्छीमारांची लवकर सुटका करण्याची विनंती केली,’ असे झा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले.