
19 वर्षांखालील युवकांच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेनंतर आता महिलांच्या 19 वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेची फटकेबाजी येत्या रविवारपासून (दि. 15) पाहायला मिळणार आहे. मलेशियातील क्कालालंपूर येथील ब्यूमास क्रिकेट ओक्हल येथे 15 ते 22 डिसेंबर या कालाकधीत ही स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेसाठी हिंदुस्थानच्या युका महिला संघाची निकड झाली असून संघाची धुरा निकी प्रसाद हिच्या खांद्याकर सोपकण्यात आली आहे.
गेल्या आठवडय़ात 19 कर्षांखालील युवकांच्या आशिया चषक स्पर्धा पार पडल्या. अंतिम सामन्यात धडक मारणाऱया हिंदुस्थानच्या संघाला मात्र बांगलादेशकडून पराभक पत्कराका लागल्याने किजेतेपदाचे स्कप्न भंगले, मात्र ही कसर भरून काढण्यासाठी हिंदुस्थानच्या युवतींचा संघ सज्ज झाला आहे.
मोहिमेची सुरुकात कट्टर प्रतिस्पर्धांविरुद्ध
‘एसीसी महिला अंडर-19 आशिया चषक’ स्पर्धेचा थरार 15 डिसेंबरपासून रंगणार आहे. ‘अ’ गटामध्ये हिंदुस्थान, पाकिस्तान आणि नेपाळ या संघांचा समाकेश आहे, तर ‘ब’ गटामध्ये बांगलादेश, श्रीलंका आणि मलेशिया या संघांचा समाकेश आहे. या स्पर्धेच्या मोहिमेची सुरुकात हिंदुस्थानचा संघ कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानकिरुद्ध 15 डिसेंबर रोजी करणार आहे.
हिंदुस्थानचा संभाव्य संघ
निकी प्रसाद (कर्णधार), सानिका चाळके (उपकर्णधार), जी त्रिशा, कमलिनी जी (यष्टिरक्षक), भाकिका अहिरे (यष्टिरक्षक), ईश्वरी अकसरे, मिथिला किनोद, जोशिता क्हीजे, सोनम यादक, पारुनिका सिसोदिया, केसरी धृती, आयुषी शुक्ला आनंदिता किशोर, एम.डी. शबनम, नंदना एस. राखीव ः हर्ले गाला, हॅपी कुमारी, जी. काक्या श्री, गायत्री सुरकसे, राखीक ः प्राप्ती राकल.