
1 जानेवारीपासून रेल्वेचे नवे वेळापत्रक
2025 मध्ये रेल्वे मंत्रालय योजनेंतर्गत सर्व 136 वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन, 2 अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन आणि नमो भारत रॅपिड रेल (वंदे भारत मेट्रो) ला लाँच केले जाणार आहे. त्यामुळे रेल्वे विभाग 1 जानेवारी 2025 ला एक नवीन वेळापत्रक जारी करणार आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे 13 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या महाकुंभसाठी रेल्वे विशेष रेल्वे सोडणार आहे. यासाठी रेल्वे विभागाने जोरदार तयारी केली आहे.
दिल्लीकरांनी वर्षभरात खाल्ले 60 कोटींचे नूडल्स
ऑनलाईन जेवण मागवणे आता सर्रास झाले आहे. दिल्लीकरांनी 2024 मध्ये तब्बल 60 कोटी रुपये किमतीचे नूडल्स ऑर्डर केले होते, अशी माहिती स्विगी इन्स्टामार्ट रिपोर्टमधून उघड झाली आहे. मुंबई, दिल्ली, चेन्नई यांसारख्या शहरांत ऑनलाईन ऑर्डर मोठ्या प्रमाणात करण्यात आली. दिल्लीत नूडल्ससोबत सर्वात जास्त आलू चिप्सची ऑर्डर करण्यात आली. सर्वात जास्त ऑर्डर करणाऱ्या पदार्थांमध्ये दूध, दही, चिप्स आणि कोल्ड्रिंक्सचा समावेश आहे.
बँक ऑफ बडोदामध्ये 1267 पदांसाठी भरती
बँक ऑफ बडोदामध्ये स्पेशलिस्ट ऑफिसरच्या 1267 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. उमेदवाराकडे बीई, बी.टेक पदवी, पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदवी, एमबीए/पीजीडीएम, सीए/सीएफए/सीएमए पदवी असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय 24 ते 34 वर्षांपर्यंत असायला हवे. ऑनलाईन परीक्षेसह या भरतीसंबंधीची सविस्तर माहिती बँकेची अधिकृत वेबसाइट www.bankofbaroda.in वर उपलब्ध आहे.
चोरी करून गर्लफ्रेंडला द्यायचा महागडे गिफ्ट
गर्लफ्रेंडला महागडे गिफ्ट देण्यासाठी रस्त्यावर उभ्या असलेल्या कारची चोरी करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीचे नाव शुभम असून तो उत्तर प्रदेशातील कानपूरमधील रहिवासी आहे. गर्लफ्रेंडच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी तो चोरी करायचा असे त्याने पोलीस तपासात सांगितले. गर्लफ्रेंडला महागडे गिफ्ट देण्यासाठी त्याने थेट चोरी करण्यास सुरुवात केली. कार चोरणाऱ्या टोळीतील बाकीचे तरुणसुद्धा गर्लफ्रेंडसाठी चोरी करायचे, असे शुभमने सांगितले.
जॅकलिनसाठी सुकेश चंद्रशेखर बनला सांताक्लॉज
200 कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील आरोपी सुकेश चंद्रशेखर ख्रिसमस दिवशी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिच्यासाठी सांताक्लॉज बनला. सुकेशने जॅकलिनसाठी एक पत्र पाठवले असून ते आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या पत्रात सुकेशने जॅकलिनला बोम्मा आणि बेबी गर्ल असे म्हणत ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तुझ्यापासून दूर असूनही मी स्वतःला सांताक्लॉज बनण्यापासून रोखू शकत नाही, असे सुकेशने पत्रात म्हटले आहे.
मस्तच! इयरबड्सवर कळणार ताप आला की नाही!!
अॅपल आपल्या आगामी एअरपोड्स प्रोची जोरदार तयारी करत आहे. ब्लूमबर्गच्या मार्क गुरमॅनच्या रिपोर्टनुसार, कंपनी एक मोठी कामगिरी करण्याच्या तयारीत आहे. या बड्समध्ये काही नव्या फीचरची टेस्टिंग केली जात आहे. याच्या मदतीने नेस्क्ट झेन एअरपोड्स प्रोमध्ये हार्ट रेट आणि शरीरात किती ताप आहे, हे तपासू शकता येईल. अॅपलने नेक्स्ट जनरेशन एअरपोड्स प्रोसाठी काम सुरू केले आहे. या बड्समध्ये वॉचसारखे हेल्थसंबंधित फीचर्स असेल.