शेती, ड्रायव्हिंगमध्ये नोकऱ्यांचा बोलबाला, आगामी काळात पारंपरिक क्षेत्रातील उमेदवारांची मागणी वाढणार

आयटी सेक्टरचा जॉब म्हणजे एकच नंबर असा आपल्याकडे समज आहे. केवळ आपल्या देशातच नव्हे तर जगात असे समजले जाते. म्हणूनच आयटी आणि टेक सेक्टरकडे तरुणाई अधिक प्रमाणात वळताना दिसते. येत्या काही वर्षांत टेक जॉब वाढतीलच, पण त्यासोबतच शेती, ड्रायव्हिंग अशा पारंपरिक नोकऱयांचा बोलबाला असेल.

वर्ल्ड इकोनॉमिक पह्रमच्या (डब्ल्यूईएफ) च्या एका अहवालानुसार, शेतात काम करणारे किंवा डिलिव्हरी ड्रायव्हर यांसारख्या पारंपरिक नोकऱ्यांची संख्या येत्या पाच वर्षांत भरमसाट वाढेल. टक्केवारीचा विचार केला तर टेक जॉब म्हणजे एआय आणि मशीन लर्निंग स्कील असलेल्या लोकांना जास्त मागणी असेल.

डब्ल्यूईएफने दिलेल्या अहवालानुसार, क्लेरिकल किंवा सेव्रेटेरियट कर्मचाऱयांच्या संख्येत मोङ्गी घसरण होईल, तर दुसरीकडे आरोग्य कर्मचारी आणि शैक्षणिक कर्मचाऱयांची संख्या लक्षणीय वाढेल. गेल्या काही दिवसांत आयटी सेक्टरमध्ये एकापाङ्गोपाङ्ग एक पंपन्यांनी कर्मचारी कपात अवलंबिली असल्याने आयटी नोकऱया धोक्यात आल्या आहेत.

एआय, मशीन लर्निंग तज्ञांना डिमांड

हिंदुस्थानात बिग डेटा, एआय, मशीन लर्निंग आणि सिक्युरिटी मॅनेजमेंट तज्ञांना मागणी दिसून येतेय. स्ट्रक्चरल फॅक्टर- डिजिटल अॅक्सेस व्यापक बनवण्यापासून उच्च राहणीमान, जलवायू परिवर्तन शमन, लोकसंख्याशास्त्राrय बदल, भू-राजनीती विखंडन अशा कार्यबलांपैकी 8 टक्के म्हणजे 92 टक्के लोक विस्थापित होऊ शकतात, तर 17 कोटी नव्या नोकऱया निर्माण होऊ शकतात. म्हणजे सध्याच्या वर्कपर्ह्सच्या 14 टक्के नोकऱया आणखी उपलब्ध होतील.