
लोकसभेत आज वर्ष 2025-26 चा केंद्रीय अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडला. या अर्थसंकल्पात 12 लाखांपर्यंतच उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे. यामुळे मध्यमवर्गीयांना दिलासा मिळाला आहे. त्यासोबतच काही वस्तू महागल्या आहेत तर काही स्वस्त झाल्या आहेत.
अर्थसंकल्पात काय झालं स्वस्त?
> हिंदुस्थानात तयार होणार कपडे
> मोबाईल फोन
> मोबाईलच्या बॅटरीसंदर्भातील 20 भांडवली वस्तूंना सूट
> इलेक्ट्रिक स्कुटी
> टीव्हीचे पार्ट्स
> LED-LCD च्या किंमती कमी होणार
> लिथियम बॅटरीत लागणारी कोबाल्ट पावडर
> कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी 56 औषधं कस्टम ड्युटी फ्री
> 36 जीवनावश्यक औषधांच्या करात सुट
> चामड्यांपासून बनवलेल्या वस्तू
> गोठवलेल्या माशांच्या पेस्टवरील मूलभूत सीमाशुल्क
> वैद्यकीय उपकरणे
काय झालं महाग?
> फ्लॅट पॅनेल डिस्प्ले, टीव्ही डिस्प्ले
> फॅबरीक (Knitted Fabrics)
> 82 सामानांवरुन सेस हटवला