IGL – इंडिया गॉट लेटेंट प्रकरणात चौघांची चौकशी

इंडियाज गॉट लेटेंटमध्ये या शोमध्ये आक्षेपार्ह टिप्पणी प्रकरणाची मुंबई पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांनी अपूर्वा मुखिजा आणि रणवीर अलाहाबादियाच्या मॅनेजरसह चौघांचे जबाब नोंदवले आहेत.

इंडियाज गॉट लेटेंट या कार्यक्रमात यूटय़ूबर रणवीर अलाहाबादियाने वादग्रस्त विधान केले होते. रणवीरने एका स्पर्धकाशी संभाषण करताना ते आक्षेपार्ह विधान केले होते. रणवीरच्या त्या कृत्याचे पडसाद सर्वत्र उमटले होते. त्याची गंभीर दखल घेत खार पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. याचा एक भाग म्हणून पोलिसांनी चौघांचे जबाब नोंदवले आहेत. त्यात अपूर्वा मुखिजा आणि रणवीर अलाहाबादियाच्या मॅनेजरचा समावेश आहे. तसेच महाराष्ट्र सायबर पोलिसांनी रणवीरसह 40 जणांना चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स जारी केले आहे. पोलिसांनी निर्मात्यांना ते 18 भाग सोशल मीडियावरून काढून टाकण्यास सांगितले आहे.