
सुभाष महामुणकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. बुधवारी सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अतूट निष्ठा असलेले महामुणकर हे चांदिवली विभागातील कट्टर शिवसैनिक होते. कुठल्याही पदाची अपेक्षा न करता गेली 55 वर्षे ते संघटनेत सक्रिय होते. विधानसभा, लोकसभा आणि महापालिकांच्या निवडणुकीत पायाला भिंगरी लावून ते प्रचाराचे काम करायचे. त्यांचा जनसंपर्क दांडगा होता. त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.