
सध्याच्या घडीला ओट्स आपल्या आहारामधील एक अविभाज्य भाग झालेले आहेत. नाश्त्यासाठी ओट्स हा पर्याय सर्वात महत्त्वाचा मानला गेलेला आहे. ओट्समध्ये फायबर सर्वाधिक असतात आणि कॅलरीज खूप कमी असतात. त्यामुळेच ओट्स खाण्यास हे अतिशय उत्तम मानले जातात. आपला आहार आरोग्यपूर्ण कसा राहील याकडे आपण नेटाने लक्ष द्यायला हवे. अधिक पोषक तत्त्वे असलेल्या पदार्थांचा आपल्या आहारात अधिकाधिक समावेश करायलाच हवा.
अलीकडे ओट्सच्या पिठापासून बनवलेली भाकरी खाण्याकडे अनेकांचा कल दिसून येत आहे. ओट्समुळे आपल्या आहाराचे निरोगी आहारामध्ये रूपांतर होते. केवळ इतकेच नाही तर इतर धान्यांपेक्षा ओट्स अधिक फायदेशीर आहे.
आपल्या आरोग्यासाठी ओट्स खाण्याचे फायदे
ओट्समध्ये कॅलरी, प्रोटीन, फायबर यांचा समावेश प्रामुख्याने असतो. शिवाय ओट्स हे ग्लूटेन फ्रीसुद्धा असतात. त्यामुळेच विविध व्याधींपासून सुटका मिळवण्यासाठी ओट्सचे सेवन उपयुक्त ठरते.
ओट्सच्या पिठामध्ये अतिशय गुणकारी फायबर आहे. त्यामुळेच ओट्सचे पीठ अधिक स्वादिष्ट आणि आरोग्यासाठी नेहमीच फायदेशीर असते.
ओट्समुळे रक्तामधील साखरेवरही नियंत्रण ठेवता येते. खासकरून मधुमेहींसाठी ओट्स खाणे हे वरदानच आहे.
ओट्समध्ये व्हिटॅमिन बी, अँटीऑक्सीडेंट, फायबर, डायटरी फायबर आणि मिनरल्स असते. हे सर्व घटक आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत.
आहारामध्ये ओट्स असल्यामुळे, हृदयविकाराचा धोका कमी प्रमाणात संभवतो. तसेच रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्य सुधारण्यासही मदत होते.
ओट्स सकाळी नाश्त्यामध्ये खाल्ल्यावर पोट भरलेले राहते. त्यामुळे लगेच भूकही लागत नाही. म्हणूनच वजन कमी करणाऱ्यांसाठी ओट्स हे खूप महत्त्वाचे मानले जातात.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)