
चंद्रपूर जिल्हातील गोंडपिंपरी तालुक्यात काही भागात वादळी पावसासह गारपीट झाली. वादळाने अनेक घरांवरील छते उडाली असून, मार्गांवरील झाडे कोसळली. या पावसामुळे मका, भाजीपाला, मिरची पिकाला मोठा फटका बसला आहे.
दुसरीकडे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. कालच या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद करणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात आज अचानक गारपीट आणि वादळ झाल्याने वातावरणात थोड्याप्रमाणात गारवा. यामुळे लोकांना दिलासा मिळाला.