Pahalgam Attack- पहलगाम हल्ल्यानंतर शोएब अख्तरच्या युट्यूब चॅनलवर बंदी, हिंदुस्थान सरकारचा मोठा धक्का

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, हिंदुस्थान सरकारने प्रत्येक पातळीवर पाकिस्तानवर कडक कारवाई केली आहे. या हल्ल्यात कश्मीरमधील पहलगाम येथे 26 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. सिंधू पाणी करार आणि व्हिसा बंदीनंतर भारताने माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब अख्तरचा यूट्यूब चॅनलही ब्लॉक केला. क्रिकेटपटू ते समालोचक शोएब अख्तर यांचे यूट्यूब चॅनल २८ एप्रिलला हिंदुस्थानात ब्लॉक करण्यात आले.

हिंदुस्थान सरकारने ब्लॉक केलेल्या 16 चॅनेलमध्ये क्रिकेट विश्लेषण आणि जागतिक क्रिकेटवरील मतांसाठी भारतात लोकप्रिय असलेला शोएब अख्तरचा समावेश होता. या बंदी घातलेल्या प्लॅटफॉर्मवर एकूण सुमारे 6.3 कोटी सबस्क्रायबर आहेत. यामध्ये डॉन न्यूज, समा टीव्ही, एआरवाय न्यूज सारख्या पाकिस्तानातील प्रमुख वृत्तवाहिन्या तसेच माजी पाकिस्तानी खेळाडू बासित अली यांचे चॅनेल समाविष्ट आहे. या मुद्द्यावर शोएब अख्तरकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

Pahalgam Attack- पाकिस्तानी यूट्यूब चॅनल्सवर गृह मंत्रालयाची बंदी, पहलगाम घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रक्षोभक माहिती पसरवल्याबद्दल सरकारचा चाबुक!

एकामागून एक घेतले जात असलेल्या निर्णयांचा एक भाग म्हणून पाकिस्तानवर हे पाऊल उचलण्यात आले आहे. हल्ल्यानंतर सरकारने पाच निर्णय घेतले, ज्यात पहिले सिंधू जलप्रणाली अंतर्गत बंधनकारक नियम समाप्त करण्याची घोषणा करणे समाविष्ट होते. पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसाचा कालावधी फक्त 48 तासांपर्यंत कमी करण्यात आला आहे. तसेच सध्या वाघा सीमेवरून व्यापार आणि कोणत्याही प्रकारच्या वाहतुकीवर सध्या बंदी घालण्यात आली आहे.