
केंद्रातील मोदी सरकारने बुधवारी जातनिहाय जनगणना करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशवासीयांमध्ये तीव्र संताप असतानाच हा निर्णय घेण्यात आला आहे. यातच या निर्णयाच्या टायमिंगवरून काँग्रेसने सरकारला लक्ष्य केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वेळ न दवडता बातम्यांमध्ये कसं राहायचं, यात तज्ज्ञ आहेत, अशी टीका काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केली आहे. तसेच सरकारने जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली, मात्र टाइमलाइन सांगितली नाही, असंही ते म्हणाले आहेत. जयराम रमेश म्हणाले आहेत की, सरकारने आरक्षणावरील 50 टक्क्यांची मर्यादा रद्द करावी, तरच जातनिहाय जनगणना फायदेशीर ठरेल. दिल्लीत माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत.
जयराम रमेश म्हणाले आहेत की, “संविधानात दुरुस्ती करावी आणि आरक्षणावरील 50 टक्के मर्यादा रद्द करावी, अशी काँग्रेसची मागणी आहे. जेव्हा हे होईल तेव्हाच जातनिहाय जनगणना फायदेशीर ठरेल.”