यावेळी फक्त घुसू नका, पाकव्याप्त कश्मीर ताब्यातच घ्या – असदुद्दीन ओवैसी

एमआयएम पक्षाचे प्रमुख, खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानविरुद्ध धडक कृती करा, असे केंद्र सरकारला म्हटले आहे. घर में घुसके मारेंगे असे भारतीय जनता पक्षाकडून नेहमीच सांगितले जाते, पण यावेळी फक्त घरात घुसू नका, घरात जाऊनच बसा, पाकव्याप्त कश्मीर ताब्यातच घ्या, असे ओवैसी यांनी म्हटले आहे. पाकव्याप्त कश्मीर हा हिंदुस्थानचाच भाग आहे, असा ठराव देशाच्या संसदेनेही मंजूर केला होता याचीही आठवण त्यांनी करून दिली. मुंबई, पुलवामा, उरी, पठाणकोट, रियासी अशा अनेक ठिकाणी यापूर्वी दहशतवादी हल्ले झाले आहेत. यावेळी संपूर्ण विरोधी पक्ष सरकारच्या मागे उभा राहिला आहे, त्यामुळे आता मोदी सरकारने दहशतवाद संपुष्टात आणावा, असे ओवैसी म्हणाले.