फेल मॅक्सवेल उर्वरित हंगामाला मुकणार

आयपीएलमध्ये फॉर्मसाठी झगडणारा आणि पूर्णपणे फेल असलेला पंजाबचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल हाताच्या बोटाला झालेल्या फ्रॅक्चरमुळे उर्वरित हंगामाला मुकण्याची शक्यता आहे. बुधवारी चेन्नईविरुद्धच्या लढतीसाठी नाणेफेकीच्या वेळी कर्णधार श्रेयस अय्यरने मॅक्सवेल दुखापतीमुळे खेळत नसल्याचे सांगितले. त्यानंतर सामना सुरू होण्यास काही वेळ असताना पंजाब संघातीलच अन्य सदस्य मार्कस स्टोइनिसने मॅक्सवेलची दुखापत गंभीर असून तो उर्वरित हंगामाल मुकू शकतो, असे स्टार स्पोर्टस्ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. कोलकाताविरुद्ध पावसामुळे रद्द झालेल्या सामन्यापूर्वी सराव करताना मॅक्सवेलला दुखापत झाली होती. यंदाच्या हंगामात मॅक्सवेलने 6 सामन्यांत फक्त 48 धावा केल्या आहेत.