
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी संध्याकाळी दिल्लीत काँग्रेस कार्यकारिणी समितीची (CWC) बैठक झाली. बैठकीत खर्गे म्हणाले की, पहलगाम हल्ल्याबाबत केंद्र सरकारचे धोरण आद्यपही स्पष्ट नाही. X वर एक पोस्ट करत त्यांनी या बैठकीत झालेल्या चर्चेबद्दल माहिती दिली आहे.
मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले आहेत की, “देशाच्या एकता आणि अखंडतेत अडथळे निर्माण करणाऱ्या कोणालाही आम्ही एकत्रितपणे सामोरे जाऊ. या मुद्द्यावर संपूर्ण विरोधी पक्ष सरकारसोबत उभा आहे.” ते म्हणाले आहेत की, “पहलगाम हल्ल्यानंतरही केंद्र सरकारकडून कोणतीही स्पष्ट रणनीती समोर आलेली नाही.” खर्गे म्हणाले की, हल्ल्यानंतर राहुल गांधी यांनी कानपूरमध्ये शुभम द्विवेदीच्या कुटुंबाची भेट घेतली. तसेच त्यांनी सरकारकडे मृतांना शहीदांचा दर्जा आणि आदर देण्याची मागणी केली आहे.
























































