
शेतकर्यांच्या कर्जमाफीसह अन्य न्याय्य मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बुलढाण्यात शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेकडो ट्रॅक्टरसह हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले होते.