
अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. ‘पंचायत सीझन 4’ चा टीझर प्रदर्शित झाला आहे. कॉमेडी ड्रामा सुपरहिट वेब सिरीज ‘पंचायत सीझन 4’ ची पहिली झलक समोर आली आहे. आणि टीझर येताच चाहते ही सिरिज पाहण्यासाठी खूप उत्सुक झाले आहेत. ओटीटीवरील सर्वात लोकप्रिय सिरिज ‘पंचायत’चे तीन सीझन प्रदर्शित झाले आहेत आणि तिचा चौथा सीझन लवकरच येणार आहे.
यावेळी बिहार निवडणुकीपूर्वी, फुलेरा गावाची निवडणूक या सिरिजद्वारे ओटीटीवर जाहीर करण्यात आली आहे. कारण या निवडणुका ‘पंचायत सीझन 4’ मध्ये पाहायला मिळणार आहेत. अशी टीझरची सुरुवात आहे, ‘भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे, आणि फुलेरा गाव या लोकशाहीचा एक छोटासा भाग आहे.’ या वर्षी देखील मोठी लढत होईल, असे या ‘पंचायत सीझन 4’ मध्ये पाहायला मिळणार आहे. गावातील कथा दर्शवणाऱ्या या सिरिजच्या पहिल्या सीजनने चाहत्यांना वेड लावले आहे. चाहत्यांच्या या प्रेमामुळेच निर्माते पंचायतचा पुढचा सीझन आणण्यास सज्ज झाले आहेत. ‘पंचायत सीझन 4’ 2 जुलै 2025 रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.