डीआरडीओमध्ये 40 अप्रेंटिस पदांची भरती

संरक्षण संशोधन आणि विकास संघटना म्हणजेच डीआरडीओमध्ये 40 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया 29 एप्रिलपासून सुरू झाली असून 20 मे 2025 पर्यंत अर्ज भरता येणार आहे. या भरती अंतर्गत ग्रंथालय आणि माहिती विज्ञान ः 20 पदे, संगणक विज्ञान ः 7 पदे, छायाचित्रण, व्हिडीओग्राफी ः 2 पदे, प्रिंटिंग टेक्नॉलॉजी ः 1 पदांची भरती केली जाणार आहे. भरतीसंबंधी शैक्षणिक पात्रता, मासिक मानधन यासंबंधीची सविस्तर माहिती डीआरडीओची अधिकृत वेबसाइट drdo.gov.in वर माहिती देण्यात आली आहे.